लेखणी बुलंद टीम:
70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा नुकताच करण्यात आलीये. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून ही नावे घोषित करण्यात आली आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून कलाकारांचा गाैरव हा केला जाणार आहे. यामध्ये सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट म्हणून कांताराला पुरस्कार मिळालाय. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून रिषभ शेट्टी याला पुरस्कार मिळालाय. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नित्या मेनन हिला मिळाला असून चित्रपट कच्छ एक्सप्रेसला हा पुरस्कार मिळालाय. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सुरज बर्जाद्या मिळाला असून चित्रपट उंचाईसाठी हा पुरस्कार मिळालाय.
मराठी चित्रपट वाळवीला देखील 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट हा पुरस्कार मिळालाय. नौशाद सदर खानला या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार देण्यात आला. फौजा चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालाय. अट्टम या मल्याळम चित्रपटाला 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट संपादनाचा पुरस्कार मिळाला आहे.