70 वर्षीय वृद्ध रूग्णाने एम्स रुग्णालयातील पंख्याला घेतला फास

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

ओडिशा ची राजधानी भुवनेश्वरमधील एम्स रुग्णालयात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे ऑर्थोपेडिक वॉर्डमध्ये दाखल असलेल्या 70 वर्षीय वृद्ध रुग्णाचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. दिलीप कुमार साहू असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

तो जाजपूर जिल्ह्यातील अटालापूर गावचा रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना तो अशा अवस्थेत आढळला. सध्या पोलीस मृताच्या कुटुंबीयांची आणि रुग्णालयात उपस्थित लोकांची चौकशी करत आहेत.

ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली असावी असा अंदाज आहे, मात्र नेमकी वेळ आणि कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेच्या वेळी वॉर्डमध्ये सुमारे 30 रुग्ण आणि 10 रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते, तरीही या घटनेची माहिती कोणालाही मिळाली नाही, असे सांगण्यात येत आहे. ही बाब रुग्णालयाच्या सुरक्षा आणि देखरेख व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.पोलिस पुढील तपास करत आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *