मिळालेल्या माहितनुसर नागपूरमधून एक लज्जास्पद घटना समोर आली आहे. 58 वर्षीय आरोपीने त्याच्या शेजारी खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या निष्पाप मुलीवर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलगी तिच्या घराच्या अंगणात इतर मुलांसोबत खेळत असताना ही घटना घडली. ट्रेझरी विभागात नोकरीला असलेल्या आणि अलिकडेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या आरोपीने मुलीला लाड करण्याच्या बहाण्याने बाजूला नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यानंतर तो तिथून निघून गेला.
दुसऱ्यादिवशी पालकांनी जेव्हा त्यांनी मुलीला तिच्या ओठांवर झालेल्या जखमेबद्दल विचारले तेव्हा तिने आरोपीचे नाव सांगितले. ही माहिती मिळताच संतप्त कुटुंबीयांनी आणि जवळच्या नागरिकांनी आरोपीला पकडून बेदम मारहाण केली. घटनेची माहिती मानकापूर पोलिसांना देण्यात आली आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि त्याच्याविरुद्ध विनयभंग आणि पोक्सो कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला.