ॲपल कंपनीच्या आयफोन 16 या फोन सिरिजची सगळीकडे चर्चा आहे. या फोनमध्ये अनेक भन्नाट फिचर्स आहेत.
नुकतेच अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपन्यांनी या फोनवर दमदार सूट जाहीर केली होती.
त्यानंतर आता उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आयफोन यांच्याकडून 16 या फोनवर मोठी सूट दिली जात आहे.
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स डिजिटल या रिटेल चेनकडून आयफोन 16 वर सूट दिली जात आहे. रिलायन्स डिजिटलवर आयफोन 16 (128 जीबी स्टोअरेज) या फोनची किंमत 79900 रुपये आहे.
मात्र रिलायन्स डिजिटलकडून या फोनच्या खरेदीरवर 5000 रुपयांची सूट मिळत आहे. ही सूट ग्राह्य धरली तर तुम्हाला हा फोन फक्त 74900 रुपयांना मिळेल.तुमच्याकडे आयसीआयसीआय, एसबीआय, कोटक या बँकांचे क्रेडिट कार्ड असेल, तर तुम्हाला ही 5000 रुपयांची सूट मिळू शकते.विशेष म्हणजे वर नमूद केलेल्या बँकांच्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून आयफोन 16 खरेदी केल्यास तुम्हाला 12483 रुपयांच्या नो कॉस्ट इएमायचीही सुविधा मिळेल.सप्टेंबर 2024 मध्ये अॅपल कंपनीने आयफोन 16 सिरीज लॉन्च केलेली आहे.