आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन केले होते. रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार करण्यात आले.
मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद रोहित शर्माच्या हातून सोडून हार्दिकच्या हाती गेले. गेल्या हंगामातही रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापन यांच्यातील संबंध फारसे चांगले नसल्याचा अंदाज लावला जात होता. आता केवळ रोहितच नाही तर हार्दिक पांड्यालाही संघातून वगळले जाऊ शकते अशी बातमी आहे. त्यांच्याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झी आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज टीम डेव्हिड यांनाही संघातून रिलीज केले जाण्याची शक्यता आहे.
कोणते खेळाडू कायम ठेवणार, कोण होणार कर्णधार?
रोहित आणि हार्दिकसह 4 खेळाडूंना मुंबई इंडियन्सकडून डच्चू मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे, मेगा लिलावापूर्वी सूर्यकुमार यादवला कायम ठेवून मुंबई इंडियन्स पुढील हंगामासाठी नवीन कर्णधाराची नियुक्ती करू शकते. जसप्रीत बुमराह संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज राहू शकतो. त्यांच्याशिवाय, मुंबई इंडियन्स इशान किशन आणि तिलक वर्मा यांना कायम ठेवण्याचा दावा करत आहे. दरम्यान, मुंबई आकाश मधवाल आणि निहाल वढेरा यांना राईट टू मॅच (RTM) कार्ड वापरू शकते.
हे खेळाडू कायम ठेवता येतील: सूर्यकुमार यादव (संभाव्य कर्णधार), जसप्रीत बुमराह, इशान किशन, तिलक वर्मा
हे खेळाडू रिलीज केले जाऊ शकतात: रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, जेराल्ड कोएत्झी, टीम डेव्हिड
राईट टू मॅच (RTM कार्ड): आकाश मधवाल, निहाल वढेरा
सूर्यकुमार यादव कर्णधार?
टीम इंडियाचा टी-20 चा कर्णधार झालेला सूर्यकुमार यादवही मुंबई इंडियन्सकडून खेळतो. तसेच आयपीएलचा लिलावही जवळ येत आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवला संघात कायम ठेवण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीला मोठी रक्कम खर्च करावी लागेल. तसेच पुढील हंगामापासून सूर्यकुमार यादवला कर्णधार केली जाण्याची शक्यता आहे.