मुंबईत 35 वर्षीय व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात दिवसाढवळ्या खून, अपहरण, हत्या अशा गुन्हेगारींच्या घटनेत वाढ होत आहे. त्यातच आता मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मिरारोडमधील शांतीनगर परिसरात ही घटना घडली. मोहम्मद तबरेज अन्सारी असे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईजवळ असलेल्या मीरा रोड परिसरात शुक्रवारी रात्री एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मीरा रोडवरील शांती शॉपिंग सेंटरमध्ये ही घटना घडली. यात एका 35 वर्षीय व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मोहम्मद तबरेज अन्सारी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तबरेज हा एका गंभीर गुन्ह्याचा साक्षीदार होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्याला धमक्या येत होत्या. याबद्दल तबरेज यांनी पोलिसात तक्रारही दाखल केली होती.

मात्र शुक्रवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे दुकानाबाहेर उभा असताना तबरेजवर एका अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. यातील एक गोळी त्याच्या डोक्याला लागली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. तबरेज अन्साही यांचे मीरारोड रेल्वे स्थानकाजवळच असलेल्या शांती शॉपिंग सेंटरमध्ये चष्म्याचे दुकान आहे. रात्री 10 च्या सुमारास ही घटना घडली.

पोलिसांकडून तपास सुरु
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपींची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे गोळा केले आहेत. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. नयानगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *