आंध्रप्रदेशातून भाविकांना शिर्डीला घेऊन जाणारी बस बुलढाण्यात उभ्या असलेल्या ट्रकला जाऊन धडकून अपघात झाला. या अपघातात 35 भाविक जखमी झाले. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातात जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
मलकापूर-नांदुरा राष्ट्रीय महामार्गावर वडनेर भोळजीजवळ पहाटे 3 वाजता एका ट्रॅव्हल व्हॅनने उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिलीजखमींना रुग्णालयात नेल्यानंतर पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला आहे. बसमध्ये सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले होते किंवा ट्रक चुकीच्या ठिकाणी पार्क केला होता. या प्रकरणी चौकशी सुरू आहे. अपघातानंतर स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने मदत आणि बचाव कार्य हाती घेतले. यामुळे सर्व जखमींना वेळेवर रुग्णालयात नेणे शक्य झाले. गंभीर जखमींच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. गरज पडल्यास, या लोकांना दुसऱ्या रुग्णालयातही नेले जाऊ शकते.पोलिसांचा तपास सुरु आहे.