गणेश मूर्तींच्या किंमतीत 30 टक्क्यांनी वाढ ,नागरिक हैराण

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस  पडत आहे. त्यातच गणेशोत्सव तोंडावर आला आहे. गणेश मूर्ती बूक करण्यासाठी भाविक दुकानात गर्दी करत आहेत. मात्र, नुकतीच गणेशभक्तांना थक्क करणारी गोष्ट समोर आली आहे. गणेश मूर्ती विक्रेत्यांनी गणेश मूर्तींच्या किंमतीत 30 टक्क्यांनी वाढ (Ganpati Idol Price increase)केली आहे. ज्यामुळे सर्वसामांन्याचा खीसा चांगलात रिकामा होणार आहे. काही ठिकाणी मूर्ती दुप्पट भावात विकल्या जात आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून, रायगड जिल्ह्यातील पेण शहरात सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे गणपती मूर्ती भिजल्या आहेत. काहींचे रंग उतरले आहेत. तर, काहींची माती निघाली आहे. मूर्तींची लक्षणीय कमतरता जाणवू लागली असल्याने मूर्तींच्या किमतीत 25 ते 30 टक्के वाढ झाली आहे.

 

काही स्थानिकांनी आपली निराशा व्यक्त करत म्हटले की, ‘दरवर्षी एकाच दुकानात आम्ही गणेश मूर्ती बुक करतो. गेल्या आठवड्यात आम्ही आमची गणपतीची मूर्ती बुक करण्यासाठी गेलो होतो. दरवाढ पाहून आम्ही थक्क झालो. गेल्या वर्षी एक फूट उंचीच्या गणपती मूर्तीची किंमत 1,800 होती, मात्र यंदा त्याच मूर्तीची किंमत 3,000 आहे. आम्ही जवळपास दुप्पट किंमतीत मूर्ती विकत घेत आहोत. कारण विचारले तर सांगण्यात येते की, मुसळधार पावसामुळे मूर्तींची कमतरता आहे.’

 

मूर्ती उत्पादकांचे प्रमुख केंद्र असलेल्या पेण शहरातील गणपती मूर्तींच्या उत्पादनावर पावसाचा गंभीर परिणाम झाला आहे. मुसळधार पावसामुळे मूर्ती खराब झाल्या. मूर्तींचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करूनही, शेकडो मूर्तींची नासाडी झाली. त्या विकल्या जाऊ शकत नाहीत. परिणामी, उर्वरित स्टॉकच्या किमती वाढल्या गेल्या आहेत.

 

असे चित्र असले तरीही पुण्यात उत्सव सुरू होण्याआधीच आपल्या गणपतीच्या मूर्ती बूक करण्यासाठी पुणेकरांमध्ये उत्सुकता पहायला मिळत आहे. जास्त खर्च असूनही, शेकडोच्या संख्येन नागरिक आपला ‘बाप्पा’ शोधण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी करत आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *