लेखणी बुलंद टीम:
गुरुवारी दुपारी लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या भीषण अपघातानंतर शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, तब्बल 265 मृतदेह आणण्यात आले आहेत, असे एका पोलीस पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. ‘आम्हाला मिळालेल्या संदेशानुसार 265 मृतदेह रुग्णालयात पोहोचले आहेत, असे पोलीस उपायुक्त कानन देसाई यांनी पत्रकारांना सांगितले. एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान गुरुवारी दुपारी अहमदाबाद विमानतळाजवळील मेघानीनगर नगर भागात, टेकऑफ झाल्यानंतर काही क्षणांतच कोसळले. विमानात एकूण 242 लोक होते, ज्यात 12 क्रू मेंबर्सचा समावेश होता. विमान उड्डाणानंतर लगेचच मेघानीनगर परिसरातील बीजे मेडिकल कॉलेज आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या निवासी भागात कोसळले. यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली आहे.
STORY | Ahmedabad plane crash: 265 bodies brought to civil hospital, says police official
READ: https://t.co/1kdgCZa43I pic.twitter.com/Zi8w44YqQj
— Press Trust of India (@PTI_News) June 12, 2025