खडकावर योगा करणं बेतल जिवावर,२४ वर्षाची प्रसिद्ध अभिनेत्री गेली वाहून

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण आता सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यांनंतर तुम्हाला देखील धक्का बसेल. सध्या सोशल मीडियावर 24 वर्षीय रशियन अभिनेत्री कमिला ब्लेयात्सकाया हिचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ थायलंडमधील कोह सामुई येथील आहे. समुद्र किनारी योग करत असताना लाटेत अभिनेत्री वाहून गेल्याचं भयानक चित्र व्हिडीओमध्ये दिसत आहे. सध्या अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये अभिनेत्री समुद्राच्या मध्यभागी खडकावर बसून योगा करताना दिसत आहे. या अपघातापूर्वीही कमिलाने या ठिकाणाचं सौंदर्य दाखवणारी एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये तिने सांगितले होते की तिला कोह सामुई प्रचंड आवडतं…

पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणाली होती, ‘मला समुई प्रचंड आवडतं. हे खडक मी माझ्या आयुष्यात पाहिलेल्या समुद्रकिनाऱ्यावरील सर्वोत्तम गोष्ट आहे….’, अभिनेत्रीच्या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिय देत आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या दुर्दैवी अपघाताची चर्चा रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घडलेल्या घटनेची माहिती मिळतात रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली. परंतु धोकादायक परिस्थितीमुळे शोध मोहीम काही काळ थांबवण्यात आली. मात्र, अभिनेत्री ज्या खडकावर बसून योगा करत होती, त्या खडकापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर तिचा मृतदेह सापडला. संबंधित प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

बॉयफ्रेंडसोबत सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी आली होती कमिला
मिळालेल्या माहितीनुसार कमिला बॉयफ्रेंडसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत होती. अभिनेत्री कायम थायलंडमधील कोह सामुई येथे येत असे. कारण अभिनेत्रीला हे स्थळ प्रचंड आवडलं होतं. ‘पृथ्वीवरील सर्वात चांगली जागा…’ असं देखील अभिनेत्री या जागेला म्हणायची.

या घटनेनंतर, स्थानिक अधिकाऱ्यांनी कारवाई केली आणि खडकाळ भागात प्रवेश प्रतिबंधित केला… अशी माहिती स्थानिक माध्यमांकडून मिळत आहे. सामुईरेस्क्यू सेंटरचे प्रमुख चैपोर्न सबप्रासेट म्हणाले, ‘पावसाळ्याच्या काळात, आम्ही पर्यटकांना सतत चेतावणी देतो…’ सध्या सर्वत्र घटनेची चर्चा रंगली आहे.

पहा व्हिडिओ:

 

https://twitter.com/vincent31473580/status/1863367392749129955

 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *