मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमध्ये अडकले महाराष्ट्रातील 200 प्रवासी

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

 

सध्या उत्तराखण्डात ढगफुटी आणि अति मुसळधार पावसामुळे यमुनोत्रील नद्यांना पूर आला आहे. रस्ते खचले असून पूल तुटले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पर्यटक, भाविक अडकले आहे. या मध्ये 200 प्रवासी महाराष्ट्रातील आहे. अशी माहिती समोर आली आहे. पर्यटकांचे व्हिडीओ समोर आले असून ते महाराष्ट्र सरकारकडे मदतीची याचना करत आहे. सध्या मुसळधार पावसामुळे यमुनोत्रीत रेड अलर्ट जारी केले आहे.

गेले काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये पावसाने जोर धरला असून अति मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाकडून या ठिकाणी रेड अलर्ट जारी केला आहे.

उत्तरकाशीतील सिलाई बँड परिसरात ढगफुटीमुळे यमुनोत्री महामार्ग तुटल्याने 600 हुन अधिक भाविक यमुनोत्री धाम मध्ये अडकले आहे. रस्ते बंद झाल्याने यात्रा स्थगित करण्यात आली आहे. यात्रींना सुरक्षित ठिकाणी थांबवले आहे.
यमुना आणि गंगा नद्यांचे जलस्तर वाढल्याने पूर आणि भूस्खलनाचा धोका वाढला आहे. देहरादून, नैनीताल, हरिद्वार, टिहरी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, चंपावत आणि उधमसिंग नगरसह अनेक जिल्ह्यांत हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *