270 किलोग्रॅमचे वजन उचलताना 17 वर्षीय पॉवरलिफ्टर तरुणीचा मृत्यू, पहा व्हायरल व्हिडिओ

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

या आधी जीममध्ये वर्कआउट करताना अनेक लोकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. आता राजस्थानमध्ये 17 वर्षीय राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग चॅम्पियन यष्टिका आचार्य हिचा प्रशिक्षणादरम्यान झालेल्या दुर्दैवी अपघातात निधन झाले. बीकानेर, राजस्थान येथे प्रशिक्षण घेत असताना, ती 270 किलोग्रॅम वजन उचलण्याचा प्रयत्न करत होती, मात्र हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि वजन तिच्या मानेवर पडले, ज्यामुळे गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला. या घटनेने क्रीडा जगतात शोककळा पसरली आहे.

यष्टिका आचार्यच्या अकाली निधनामुळे सर्वत्र दुःख व्यक्त केले जात आहे. या घटनेचा एका धक्कादायक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यष्टिकाने तिच्या लहानशा करिअरमध्ये महत्त्वपूर्ण यश संपादन केले होते. गोव्यात आयोजित 33 व्या नॅशनल बेंच प्रेस चॅम्पियनशिपमध्ये तिने इक्विप्ड कॅटेगरीत सुवर्णपदक आणि क्लासिक कॅटेगरीत रौप्यपदक जिंकले होते.

 

 

https://twitter.com/mid_day/status/1892419808429568277


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *