बिलासपूर, छत्तीसगडमध्ये, एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने त्याच्या आजीवर गोळी झाडली आणि गोळी झाडल्यानंतर त्याने पुष्पा चित्रपटातील डायलॉग देखील म्हंटला आहे.डायलॉग म्हणतांना तो म्हणाला की, ‘फ्लावर नहीं फायर हूं मैं. ही घटना बिलासपूरच्या सिपत पोलीस स्टेशन अंतर्गत मटियारी ग्रामपंचायतीत घडली आहे. जिथे, एका कुटुंबात आणि त्याच्या मामाच्या कुटुंबातील वादामुळे, पुष्पाचा डायलॉग म्हणतांना, त्याने त्याच्या 37 वर्षीय आजोबांच्या बंदुकीने आजीला गोळ्या घातल्या. या घटनेनंतर घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या गोळीबारात आजीसह एक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.
माहिती देताना सिपत पोलिस स्टेशनचे प्रभारी गोपाल सतपथी म्हणाले की, दोन कुटुंबांमध्ये पूर्वीपासून कौटुंबिक वाद सुरू होता. 13 डिसेंबरच्या रात्री अल्पवयीन आणि त्याच्या काकामध्ये बाचाबाची झाली होती. यानंतर काही काळ दोघांमध्ये वाद सुरू राहिला आणि रागाच्या भरात अल्पवयीन मुलाने घरातून बंदूक आणून गोळीबार केला. या गोळीबारात आजी आणि शेजारील एक व्यक्ती जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी घटनास्थळ गाठून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून एक बंदूकही जप्त केली. अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.