नक्षली कारवायांसाठी सातत्याने चर्चेत असेलल्या छत्तीसगडमधील बस्तरमध्ये काही दिवसांपूर्वीच दोन चकमकीत 30 नक्षलवाद्यांना (Naxal) ठार करण्यात आले होते.
दरम्यान, छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत आज 16 नक्षलवादी ठार करण्यात आले आहेत.घटनास्थळी मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक शस्त्रे जप्त करण्यात आली असून, यात इंसास आणि SLR सारखी हत्यारे असल्याने ठार झालेल्यांमध्ये काही महत्त्वाच्या नक्षल नेत्यांचा समावेश असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये अद्यापही चकमक सुरू असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळी तपासणी सुरू असून, सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.काही दिवसांपूर्वी येथील कारवाईत 30 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. विजापूर-दंतेवाडा सीमेवरील नक्षलवाद्यांच्या मुख्य भागात सैन्याने प्रवेश करत नक्षलवाद्यांच्या मोठ्या टोळीला घेरले होते.
या कारवाईत नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले होते. तर, काही दिवसांपूर्वी 64 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते.
त्यानंतर आता पुन्हा एकदा छत्तीसगडमध्ये 16 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश मिळाले आहे.