लेखणी बुलंद टीम:
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील 12 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी बुधवारी मुख्य आरोपी, आरोपीची तिसरी पत्नी आणि आणखी एका व्यक्तीला अटक केली. तसेच कल्याणचे पोलिस उपायुक्त यांनी सांगितले की, मुख्य आरोपी त्याला बुधवारी सकाळी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातील 12 वर्षीय मुलीचे सोमवारी दुपारी कल्याण येथून अपहरण करण्यात आले असून मंगळवारी सकाळी तिचा मृतदेह जिल्ह्यातील भिवंडीजवळ आढळून आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिस उपायुक्तांनी सांगितले की, मुख्य आरोपीला पोलिसांच्या पथकाने बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून अटक केली असून त्याला येथे आणले जात आहे. आरोपी हा बुलढाणा येथे सासरच्या घरी असून त्याला पकडले. याप्रकरणी मुख्य आरोपीची तिसरी पत्नी आणि अन्य एका व्यक्तीलाही अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. बँकेत काम करणारी त्याची पत्नीहिला बुधवारी अटक करून स्थानिक न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता त्यांनी तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
तसेच पोलिस उपायुक्त यांनी सांगितले की, सोमवारी दुपारी चारच्या सुमारास ही मुलगी कल्याण शहरातील घराबाहेर खेळत असताना अज्ञात व्यक्तीने तिचे अपहरण केले. हत्येमागचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही, असे ते म्हणाले. पोलिसांनी आत्तापर्यंत जवळपास 10 जणांची चौकशी केली असून त्यात आरोपीचे नातेवाईक आणि मित्र यांचा समावेश आहे.