नोकरी अलर्ट! स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

भारतीय स्टेट बँक देशभरात 6589 रिक्त जागांवर ज्युनिअर असोसिएट (ग्राहक सेवा आणि सहायता) या पदाची भरती करणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं बुधवारी याबाबत माहिती दिली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 6 ऑगस्टपासून म्हणजेच आजपासून सुरु होत आहे.

स्टेट बँकऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार ज्युनिअर असोसिएट पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 6 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या कालावधीत सुरु राहील. आर्थिक वर्ष 2025-26 मधील नवीन भरती गेल्या काही महिन्यांपूर्वी 505 प्रोबेशनरी ऑफिसर्स आणि 13455 जागांवरील ज्युनिअर असोसिएटची भरती प्रक्रिया झाल्यानंतर सुरु होत आहे. स्टेट बँकेला संपूर्ण देशभरातील शाखांमध्ये सेवेचा दर्जा वाढवायचा आहे.

स्टेट बँकेच्या या देशव्यापी भरती प्रक्रियेमुळं खातेदारांना दिल्या जाणाऱ्या सेवेत सुधारणा होईल. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत आणि कार्यालयात नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. ज्यामुळं उमेदवारांना एक गतिशील आणि नामांकित संस्थेत नोकरीची संधी मिळेल. स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन सीएस शेट्टी यांनी म्हटलं की नवी प्रतिभा असणाऱ्या लोकांना सहभागी करुन घेणं, तंत्रज्ञान आणि बँकिंग संदर्भातील आवश्यक कौशल्यांचं प्रशिक्षण देत मानव संसाधन क्षमता मजबूत करण्याचा प्रयत्न आहे, असं म्हटलं.

ज्युनिअर असोसिएटच्या भरती प्रक्रियेत महाराष्ट्रातून एकूण 476 जागा भरल्या जाणार आहेत. याशिवाय काही बॅकलॉग म्हणून राहिलेल्या जागा देखील भरल्या जाणार आहेत.

पात्रता
स्टेट बँक ज्युनिअर असोसिएट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 20 ते 28 वर्षांदरम्यान असावं. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयाची अट 3 वर्षांनी शिथील करण्यात आली आहे. एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 वर्ष वयोमर्यादा शिथील आहे.

ज्युनिअर असोसिएट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी देशातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. पदवीच्या शेवटच्या वर्षात असणाऱ्या किंवा शेवटच्या सत्र परीक्षेत शिकणारे विद्यार्थी अर्ज करु शकतात. मात्र, अंतिम नियुक्तीवेळी पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं गुणपत्रक द्यावं लागेल.

निवड प्रक्रिया
निवड प्रक्रिया पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा दोन टप्प्यात पार पडली. पूर्व परीक्षा 100 गुणांची असेल. इंग्रजी भाषा, गणितीय क्षमता आणि तार्किक क्षमता यावर प्रश्न विचारले जातील. ही परीक्षा एक तासाची असेल.

मुख्य परीक्षा 200 गुणांची असेल. तर, या परीक्षेत 190 प्रश्न असतील. वित्तीय जागरुकता, जनरल इंग्रजी,क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड, रिझनिंग एबिलिटी यावर प्रश्न विचारले जातील. ही परीक्षा 2 तास 40 मिनिटांची असेल. स्थानिक भाषा चाचणी परीक्षा 50 गुणांची असेल.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *