एकीकडे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडलेल्या आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्याला लाखोंच्या संख्येने चाहत्यांनी हजेरी लावली. तर दुसरीकडे जिंकल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या (RCB) चाहत्यांनी बंगळुरु शहरात मोठ्या उत्साहात विजय साजरा केला. मात्र या आनंदाला काळोखाची किनार लागली, जेव्हा स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अनेक जण जखमीही झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
ही घटना मॅचनंतर आरसीबीच्या (RCB) विजयी सेलिब्रेशनदरम्यान घडली. हजारो चाहते एकत्र आले होते आणि स्टेडियमबाहेर अचानक गोंधळ निर्माण झाला. अफवा आणि व्यवस्थेचा अभाव यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर आरसीबीचा दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची प्रतिक्रिया…
एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर घडलेल्या घटनेनंतरही संघाचा सत्कार समारंभ आत सुरूच होता. विजयानंतर 24 तासांच्या आतच चाहत्यांसह विराट कोहलीची या घटनेवर प्रतिक्रिया आली आहे. आरसीबी संघाचे अधिकृत विधान शेअर करताना त्यांनी लिहिले की, ‘माझ्याकडे काही बोलण्यासाठी शब्दच उरले नाहीत… मी पूर्णपणे तुटून गेलो आहे.” विराट कोहलीनंतर त्यांची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनेही आरसीबी संघाचे पोस्ट करताना 3 तुटलेले हृदय पोस्ट केले. 18 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, किंग विराट कोहली आयपीएल चॅम्पियन बनला आहे.
राज्य सरकारने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. आयोजकांची आणि पोलिस यंत्रणेची भूमिका तपासली जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे बंगळुरुतील विजयाचा जल्लोष काहीसा शांत झाला असून, क्रीडाप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
या दुःखद घटनेवर पहिली प्रतिक्रिया देताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने म्हटले आहे की, ‘आज दुपारी टीमची वाट पाहण्यासाठी थांबलेल्या लोकांसोबत घडलेल्या दुर्घटनेची माहिती मीडिया रिपोर्टसमधून समजली. सर्वांची सुरक्षा आणि सर्वजण बरे असणं महत्त्वाचं आहे. आरसीबी ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या प्रती शोक व्यक्त करते आणि त्यांच्या नातेवाईकांप्रति संवेदना व्यक्त करतो. या परिस्थितीसंदर्भात माहिती मिळताच तातडीनं आम्ही आमच्या कार्यक्रमात बदल केला आणि स्थानिक प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन केलं. आम्ही चाहत्यांना सुरक्षित राहावं असं आग्रह करत असल्याचं म्हटलं.