कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत 10 जणांचा मृत्यू,जाणून घ्या अपडेट

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. यामध्ये मध्यरात्री (29 जानेवारी) एक वाजताच्य सुमारास चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाल्याची तर 50 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनवेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना फोन केल्याची माहिती आहे. कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीनंतर योगी आदित्यनाथ आणि सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. योगी आदित्यनाथांनी भाविकांना अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केलं आहे. गंगा नदीच्या ज्या घाटाजवळ असाल तिथं स्नान करा, संगम घाटाकडे जाण्याचा प्रयत्न करु नका, असं देखील आवाहन योगी आदित्यनाथांनी केलं.

योगी आदित्यनाथ म्हणाले की स्नानासाठी अनेक घाट बनवण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी भाविकांना प्रशासनाच्या निर्देशांचं पालन करण्याचं आणि कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन केलं. याशिवाय अफवांवर विश्वास ठेवू नका,असं देखील ते म्हणाले. कुंभमेळा अधिकारी विजय किरण यादव यांनी देखील योगी आदित्यनाथांना माहिती दिली आहे.

संगमावर स्नान करण्याचा आग्रह सोडा
योगी आदित्यनाथ आणि सर्व धर्मगुरुंनी देखील भाविकांना आवाहन केलं आहे. स्वामी रामभद्राचार्य यांनी महाकुंभमध्ये येणाऱ्या भाविकांनी संगमावर स्नान करण्यात आग्रह सोडावा असं आवाहन केलं. तुमच्यापासून जो घाट जवळ असेल तिथं स्नान करावं, असं त्यांनी म्हटलं. लोकांनी आपल्या शिबिरातून बाहेर पडू नये, एकमेकांची सुरक्षा करावी अन् अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन भाविकांना करण्यात आलं आहे.

समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या घटनेनंतर महाकुंभमेळ्यातील नियोजनातील अव्यवस्थेबद्दल सरकारला धारेवर धरलं. भाविकांच्या मृत्यूची बातमी दु:खद आहे, ज्यांचा मृत्यू झाला त्यांना श्रद्धांजली, असं ते म्हणाले. अखिलेश यादव यांनी सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत, ज्यामध्ये गंभीर जखमींना एअर अॅम्ब्युलन्स द्वारे चांगल्या रुग्णालयात दाखल करण्यात यावं. मृत व्यक्तींची ओळख पटवून त्यांचा मृतदेह त्यांच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था करा. जे लोक हरवले आहेत त्यांना पुन्हा त्यांच्यासोबतच्या लोकांसोबत भेटण्यासाठी मदत करा. हेलिकॉप्टरचा चांगला वापर करा. सतयुगापासून सुरु असलेल्या शाही स्नानाच्या अखंड आणि अमृत परंपरांना पाहता सुरक्षा व्यवस्था करुन मौनी अमावस्येचं शाही स्नान पार पाडावं, असं अखिलेश यादव म्हणाले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *